असाच वाटल कि ह्यालाच प्रेम म्हणतात......



"जी दोन माणसं एकमेकांना नेहमी इतरांपेक्षा जास्त ओळखतात आणि समजूही शकतात, त्यांचं नातं नेहमीच प्रेमाचं रहातं. पण ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसर्‍या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं. प्रेमातून जगण्याची समज निर्माण होत नाही. तर जगण्याच्या समजेमधून खरं प्रेम निर्माण होत असतं म्हणूनच की... काय माणसाने जगात अनेक... शोध लावले, पण प्रेमाच्या माणसाचा दुरावा नाहीसा करेल अशी कुठलीच जडीबुटी त्याला अजून शोधून काढता आलेली नाही आहे. कारण आयुष्यात परिपूर्ण होण्यासाठी गर्दीने भरलेल्या जगाची काही एक आवश्यकता नसते. फक्त एका माणसाला आपलं म्हणलं की ते काम आपोआपच होऊन जातं. मग असं प्रेमाचं माणूस काही कारणाने विलग झालं तरी त्याचा विरह काही काळ देखील सहन करता येणं अशक्य होऊन बसतं. कारण आपल्या माणसाचा विरह म्हणजे फक्त एका माणसाचा दुसर्‍या माणसापासून निर्माण होणारा दुरावा नसतो. तर स्वतःच स्वतःमध्ये निर्माण होणारी अपूर्णता असते."

Comments

Popular posts from this blog

Sometimes we need to part.....

I MISS U ....