'पाऊस' एक आठवण ...........


 
 
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट,
गारठलेल्या संध्याकाळी हिरवीचिंब पायवाट...
कोणी धावताना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय,
कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात बावरातोय...
बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण
...कोणी पावसात आसवे लपवून हलके करतोय आपले मन...
कोणासाठी गर्द गहिरा, कोणासाठी हिरवे रान,
पाऊस म्हणजे वेगळीच धुंदी, हरवून जाई मनाचे भान...

Comments

Popular posts from this blog

Sometimes we need to part.....

I MISS U ....