एवढे एक करशील ना ?




शब्दांत नाही सांगता येणार ,डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
अस्वस्थ होइन मी जेव्हा ,धीर मला देशील ना ?
माझ्याही नकळत दुखावले तुला तर ,माफ़ मला करशील ना ?
ओघळले अश्रु माझे तर ,अलगद टिपून घेशील ना ?
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर ,हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा ,विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
चुकतेय मी असे वाटले कधी तर ,हक्काने मला सांगशील ना ?
हरवले मी कुठे कधी जर ,सावरून मला घेशील ना ?
कितीही भांडलो आपण तरीही ,समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला ,तू मला लक्षात ठेवशील ना ?
जीव तयार आहे तुझ्यासाठी ,गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ?
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकले,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असले
तरी माझ्यासाठी...तूच एक असशील ना ?

Comments

Popular posts from this blog

Sometimes we need to part.....

I MISS U ....