"कसा आहेस ?खूप दिवस झाले तुझ्याशी बोलली नाहीये रे.... आवाज तुझा ऐकायला माझे पण कान तरसले आहेत रे......" मला काहीच फरक पडला नाहीयेय असे तुला वाटत असेल ना? पण तुझ्या इतकेच माझे पण डोळे बरसले आहेत रे...." ..."माझ्या प्रत्तेक छोट्या छोट्या गोष्टीत होतास तू, माझ्या प्रत्तेक स्वप्नात होतास तू, खूप भिजला असशील ना माझ्या आठवणींच्या पावसाने? माझ्याही गालावरून रोज घरंगळलायस तू". सुरूवात झाली तेव्हा आपण खूप खूप बोलायचो, लपले नव्हते काहीच,एकमेकांसमोर मनाचे दरवाजे खोलायचो, रागवण्यात आणि मनवण्यात मजा होती वेगळी, आयुष्याची स्वप्न रंगवण्यात अक्खा दिवस घालवायचो. खांद्यावर तुझ्या डोके ठेवून समुद्राच्या लाटा किती सुंदर वाटायच्या, हाताने माझा हात धरलास कि,मनात संसाराच्या कल्पना थाटायच्या, काळजीने जरी ओरडलास तरी माझ्या अश्रुधारा सुटायच्या, पावसाच्या सरी मला तुझ्या सारख्या भेटायच्या. शिक्षण संपले अन तुला नोकरी लागली, तेव्हाच बहुतेक आपल्या नात्याला कुणाची तरी नजर लागली, तुझ्यावरच्या प्रेमाची माझी तहान अजून नव्हती रे भागली, विश्वास कर माझा, मी मुद्दाम नाही रे अशी वागली. तुझ्या नो...